10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

भटवाडी येथील बंधाऱ्याची आमदार नितेश राणे यांनी केली पहाणी

देवगड : भटवाडी येथील खार बंधाऱ्याच्या नादुरुस्त असलेल्या मोऱ्या व झडपे दुरुस्त करू असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले आमदार नितेश राणे यांनी आज देवगड दौऱ्यामध्ये या बंधाऱ्याची पाहणी केली.

बंधाऱ्याच्या मोऱ्या व त्याचे बांधकाम तसेच झडपे नादुरुस्त झाल्याने भटवाडी येथील शेकडो एकर जमीन खारी झाली आहे. ग्रामस्थ या जागेत पीक घेऊ शकत नाहीत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून आपण तातडीने या बंधाऱ्याच्या दुरुस्तीबाबत कारवाई करू असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेट्ये,देवगड जामसांडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरुल, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, भाजपा शहराध्यक्ष योगेश पाटकर, युवा सेलचे शहराध्यक्ष दया पाटील, यांच्यासह भटवाडी येथील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!