1.6 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रिक्षाचालक प्रवीण गावडे यांचा सत्कार

कणकवली : शहरातील रिक्षाचालकांचा प्रामाणिकपणा यापूर्वी अनेकदा समोर आला आहे. तसाच प्रामाणिकपणा प्रवीण गावडे या ज्येष्ठ रिक्षा चालकांनी दाखवला असून कणकवली रेल्वे स्टेशनवर रिक्षा व्यवसाय करणाऱ्या या रिक्षा चालकांना कणकवलीत नरडवे रस्त्यावरील म्हाडेश्वर हॉस्पिटल समोरील स्पीड ब्रेकरजवळ एक पैशाने भरलेले पाकीट पडलेले आढळले होते. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात होते. याची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परत मातोंडकर यांनी कणकवली रेल्वे स्थानक येथे जात प्रवीण गावडे यांचा सत्कार केला.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्गचे सहायक मोटार वाहन निरीक्षक पराग मातोंडकर व धनंजय हिले तसेच एस टी महसूल पथकाचे अधिकारी रुपेश कुडाळकर, चालक वैभव राणे, ऑटो रिक्षा चालक मालक संघटना – रेल्वे स्टेशन कणकवलीचे अध्यक्ष संतोष सावंत, चालक – मालक संजय मालंडकर यांच्यासह रेल्वे स्टेशन येथील रिक्षा चालक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!