10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

कोल्हापुरात एकाची हत्या

गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट ; हातगाडी लावण्यावरून वाद

कोल्हापूर : शहरात एका बाजूला गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी हजारो कोल्हापूरकर रस्त्यावर उतरलेले होते. दुसऱ्या बाजूला याच याच विसर्जन मिरवणुकीत खाद्य पदार्थांची गाडी लावण्याच्या वादातून एकाने दुसऱ्यावर चाकूने हल्ला करत खून केल्याची घटना काल रात्री कोल्हापुरात घडली आहे. विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच काही अंतरावरच ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवर आराम कॉर्नर परिसरात इम्रान इमाम मुजावर (वय ३२) यांचं रात्री पावणेआठच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीत खाद्यपदार्थांची गाडी लावण्यासाठी आला होता. मात्र याचवेळी संशियत हल्लेखोर युसुफ अलमसजीत (दाजी) यांच्यात गाडी लावण्यावरून वाद सुरू झाला. रागाच्या भरात संशियत हल्लेखोर युसुफ याने चाकूने इम्रान मुजावर याच्या छातीत चाकू भोकसून खून केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमी इम्रानला सीपीआर विभागात रुग्णालयात दाखल केले. मात्र, छातीत चाकूचा वर्मी घाव लागल्याने मुजावर याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी संशयित हल्लेखोर युसुफ याला ताब्यात घेतले. खून झाल्याची माहिती मिळताच मुजावर याच्या नातेवाईकांनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर गर्दी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!