10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

रक्तात गद्दारी आणि दलाली असणाऱ्या संजय राऊतला भाजपचे निष्ठावंत गडकरी, फडणवीस कधीच कळणार नाहीत

कणकवली : संजय राऊत यांनी भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल मुक्ताफळे उधळलीत. नितीन गडकरी यांना देशात व राजकारणामध्ये वेगळं स्थान आहे. पक्षाची निष्ठा काय असते हे नितीन गडकरी यांनी वारंवार दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्र प्रथम हे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे ब्रीद वाक्य आहे. परंतु संजय राऊतच्या रक्तात गद्दारी आणि दलाली त्यामुळे त्यांना निष्ठावान कार्यकर्ता कधीच कळणार नाही आणि नितीन गडकरी यांच्यासोबत तुमची तुलना कधीच होऊ शकत नाही, असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केला. यावेळी ते कणकवली येथील प्रहार भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, संजय राऊत येणारी मुख्यमंत्री बनण्यासाठी २०१९ मध्ये प्रयत्न अनेक प्रयत्न केले. सामनाच्या कार्यालयात बसून मुख्यमंत्री बनवा म्हणून किती फोनाफोनी सुरू होती, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या निष्ठावान लोकांचे तुम्ही नाव घेऊ नका. मुंबईतील जुना महापौर बंगला येथे तुमच्या मालकाचा मुलगा पैसा उधळायचा. आनंदाश्रममध्ये असे घडू नये असे आम्हाला देखील वाटते. संजय राऊतने आनंद दिघे यांचेही नाव घेऊ नये, असा टोलाही भाजप प्रवक्ते आ. नितेश राणे यांनी लगावला आहे.

सर्व धर्मांसाठी एकच नियम आवश्यक आहे. हिंदूंना एक न्याय आणि मुस्लिमांना वेगळा न्याय का? छगन भुजबळ यांनी यावर बोलले पाहिजे. संजय राऊत व त्यांच्या मालकाने रक्त तपासणी करून आपलं रक्त लाल आहे की हिरव हे पाहावे. कारण त्यांनी स्वतः हिंदू धर्म सोडला आहेच. त्यांनी जाऊन अजाण समोर नतमस्तक व्हावं. सुधाकर बडगुजर यांनी सावध रहावे कारण सुधाकर बडगूजर यांचा काटा संजय राऊत काढत तर नाहीय ना, असे आम्हाला वाटू लागले आहे. त्याचप्रमाणे जिथे – जिथे काँग्रेस सरकार आहे, तिथे हिंदूंना संपविण्याचा प्रयत्न सुरु आहे. जी स्थिती बांगलादेशमध्ये आहे तशीच स्थिती भारतात दिसतेय. कर्नाटकात हिंदूंची देवता गणपती बाप्पा याना पोलीस व्हॅनमधून घेऊन जात आहेत, असे दिसले. त्यामुळे महाराष्ट्रातील हिंदूंनी सावध राहावे. काँग्रेसचे सरकार आले तर हिंदूंचे सण उत्सव बंद होणार असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्षात मराठा आरक्षण दिले. जे शरद पवारांना देखील जमले नाही. रामदास कदम यांनी रामगिरी महाराजांचे समर्थन करीत नाहीत. पण राज्याचे मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे रामगिरी महाराजांचे समर्थन करतात आहे. ते आमच्या महायुतीचे नेते आहेत, ते कदम यांना सांगतील. आरक्षण घालवण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. त्याबाबत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून जनतेत जाऊन त्यांचा बुरखा फाडु. जो स्वतः मुख्यमंत्री असताना काही करू शकला नाही. शेतकरी हिताचे प्रश्न सोडवू शकला नाही. ज्यांनी असलेले आरक्षण घालवल. त्यांनी जुन्या पेंशनबाबत तोंड उघडून बोलू नये. ते प्रश्न महायुतीचे सरकार सोडविणार असल्याचा विश्वास देखील भाजप प्रवक्ते आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!