16.2 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

परशुराम उपरकर ब्लॅकमेलर | आमदार नितेश राणे कडाडले

कणकवली : ब्लकमेलिंग मध्ये ज्यांनी पीएचडी केलेली आहे. आज सिंधुदुर्गच्या राजकारणामध्ये ज्यांना कोणताही राजकीय पक्ष स्विकारण्यासाठी तयार नाही. त्यांना प्रवेश द्यायचा नाही, असे परशुराम उपरकर जेव्हा आरोप करतात. त्यामुळे कोण आरोप करत आहे यावर पण सिंधुदुर्गची जनता खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार करेल. आरोप करणाऱ्यांच पूर्ण आयुष्य हे टक्केवारी आणि ब्लॅकमेलिंगवर गेलेल आहे. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातला एकही राजकीय पक्ष त्यांना प्रवेश देण्यासाठी पण तयार नाहीय. तो व्यक्ती जेव्हा पत्रकार परिषद घेऊन शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात झालेल्या घटनेच घाणेरड राजकारण करू पाहतो, आपले खिशे भरण्याचा प्रयत्न करतो, स्वतःचे हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न करतो, त्या गोष्टी भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता खपवून घेणार नाही.

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन, आणि त्यांचे सहकारी ह्यांनी जे जिल्ह्याच्या विकासामध्ये दिलेले योगदान पालकमंत्री म्हणून आणि महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मंत्री म्हणून हे कोणालाही नाकारता येणार नाही.

त्यांच्या कामाच कौतुक करायला जमत नसेल तर अशा पद्धतीच घाणेरड राजकारण पण करू नका. केवळ पीडब्ल्यूडी खात्यावर आरोप करून स्वतःच घर चालतं का पहायचं आणि ते न होत असल्यामुळे मग पीडब्ल्यूडीचे मंत्री रविंद्र चव्हाण, पीडब्ल्यूडीचे अधिकारी, अनिकेत पटवर्धन, यांच्यावर असे घाणेरडे आरोप करायचे आणि चार ओळी बातम्या स्वतःबद्दल छापून येतात का पाहायचं आणि त्यावरून मी सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये जिवंत आहे, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न परशुराम उपरकर नावाच्या व्यक्तीचे सुरू आहेत. असा घणाघाती आरोप भाजप प्रवक्ते तथा आ. नितेश राणे यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, राजकारणामध्ये ज्याची शून्य पत आहे. मनसे पक्षातून ज्यांना हाकलून काढलं. त्यामुळे आता त्यांना ठाकरे सेना, शिंदे शिवसेना पक्षा, तसेच वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पायावर जाऊन लोटांगण घातलं तरी पण यांना प्रवेश दिला नाही. त्यानंत ते अजित पवारांजवळ नाक रगडत गेले. भारतीय जनता पक्षासाठी तर त्यांना दरवाजेच बंद आहेत. तिथे पण येण्यासाठी प्रयत्न केलेला म्हणून अशा व्यक्तीला आपण किती महत्त्व द्यायचं आणि ते बोलत असलेलं जनतेने किती गांभीर्याने घ्यायचं हा विचार करण्याचा विषय आहे. म्हणून पुन्हा आमच्य नेत्यांवर बेताल आरोप करत सुटला, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप कराल, अनिकेत पटवर्धन यांच्यावर तसेच सहकाऱ्यांवर आरोप केले तर… मग, तुमच्या पण कुंडल्या आम्हाला काढायला लागतील असा इशारा देखील आ. नितेश राणे यांनी दिला.

तसेच उगाच आमच्या जिल्ह्याच वातावरण तुमचा वैयक्तिक हिशोब चुकता करण्यासाठी खराब करत असाल तर आम्ही त्या गोष्टी खपवून घेणार नाही. जिल्ह्याच्या विकासामध्ये ज्याच एक टक्का पण योगदान नाही त्यांनी उगाच आमच्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका करू नये. परशुराम उपरकर यांच्याबद्दल आम्हाला देखील भरपूर माहिती आहे. आम्ही पण आमचा तोंड उघडू शकतो. फक्त आम्हाला कोणाला किती महत्त्व द्यायचं हे चांगलं माहित असल्यामुळे आम्ही जास्त कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठे करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!