-0.2 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

खासदार नारायण राणे यांनी वरवडे येथील मूळ गावी गणपती बाप्पाचे घेतले सपत्नीक दर्शन

कणकवली : माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार ना. नारायण राणे यांनी आपल्या कणकवली तालुक्यातील वरवडे वरवडे येथील मूळ घरातील गणपतीचे सपत्नीक दर्शन घेतले. कणकवली तालुक्यातील वरवडे गावात खासदार नारायण राणे यांचे मूळ घर आहे. यावेळी राणे दांपत्याने घरच्या गणपतीची आरती करत मनोभावे पूजा केली.

यावेळी बोलताना खासदार नारायण राणेंनी आपण दरवर्षी घरच्या गणपतीच्या दर्शनाला येतो असे सांगून गणरायाच्या कृपेने आपल कुटुंब सुखी समाधानी आहे. त्यामुळे आता बाप्पाकडे मागण्यासारखे असे काही नाही. आम्ही सुखी आहोत याचे श्रेय गणपती बाप्पाचेच, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!