10.6 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

दुचाकीची दहा वर्षीय मुलाला धडक ; मुलगा गंभीर जखमी ; गोवा बांबोळी येथे हलविले

सावंतवाडी : रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या दहा वर्षीय मुलाला धडक देत दुचाकीस्वाराने पलायन केले. या अपघातात सदर मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्याला प्रथम सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. निलेश जनार्दन पाटील ( १०, राहणार कोलगाव भोमवाडा ) असे या मुलाचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविण्यात आले.

जुन्या मुंबई – गोवा महामार्गावरील कोलगाव येथे भवानी स्टीलच्या समोर सायंकाळी उशिरा अपघात झाला. त्याच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!