कुडाळ : शहरातील वरची कुंभारवाडी येथे संदीप परशुराम पावसकर (वय ३५) यांनी आपल्या राहत्या घराच्या मागे गोवा बनावटीची ८८ हजार ८०० रुपये किमतीची दारू सापडून आली असून याप्रकरणी संदीप पावसकर याला कुडाळ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता दि. १३ सप्टेंबर पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कुडाळ येथील वरची कुंभारवाडी मध्ये राहणाऱ्या संदीप पावसकर यांच्या घरी अवैद्य दारू विक्री केली जात असल्याची माहिती कुडाळ पोलिसांना समजल्यावर पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला असता त्या घराच्या मागे गोवा बनवटीची दारू सापडून आली या मुद्देमालाची किंमत ८८ हजार ८०० रुपये एवढी असून याप्रकरणी संदीप पावसकर याला कुडाळ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत पोलीस शांताराम वराडकर यांनी फिर्याद दिली असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक क-हाडकर करीत आहेत.