कुडाळ : येथील भाजप कार्यालय येथे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात आज पासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सिंधुदुर्ग राजाची १७ दिवस सेवा केली जाणार आहे. माजी खा. डॉ. निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सन २०१० पासून कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी सिंधुदुर्ग राजाची सेवा १७ दिवस केली जाणार असून या निमित्ताने गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवसापासून पाचव्या दिवसापर्यंत विविध भजन मंडळांची भजने संपन्न झाली. आज स्वर प्रीतीचे हे ऑर्केस्ट्रा संध्या.५ वा. होणार आहे.
आठव्या दिवशी रामेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे दशावतार नाटक, नवव्या दिवशी मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक, दहाव्या दिवशी स्वर संध्या हा गायनाचा कार्यक्रम होणार असून हा कार्यक्रम आनंद शिरवलकर पुरस्कृत केला आहे. बाराव्या दिवशी कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. तेराव्या दिवशी तिरंगी डबलबारी व सत्यनारायणाची पूजा होणार आहे. ही तिरंगी बारी सिद्धेश शिरसाट यांनी पुरस्कृत केली आहे या तिरंगी बारी मध्ये बुवा दिनेश वागदेकर, बुवा समीर कदम, बुवा संतोष जोईल हे असणार आहेत. चौदाव्या दिवशी संयुक्त दशावतार नाटक होणार आहे. पंधराव्या दिवशी डबलबारी होणार असूनही डबलबारी संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी पुरस्कृत केली आहे. सोळाव्या दिवशी भजन व फुगड्या होणार आहेत तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ गणेश भक्तनिवा असे आवाहन सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.