7.1 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

मळगाव ग्रामस्थ आक्रमक, ग्रामपंचायत कार्यालयाला घातले “कुंपण”

सावंतवाडी : ऐन चतुर्थी सणात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे मळगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज थेट कार्यालयाला समोर कुंपण ठोकले. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान त्या ठिकाणी १३ पैकी एकही ग्रामपंचायत सदस्य न आल्यामुळे त्यांच्या कामाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली व उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांना धारेवर धरले. तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतच्या निष्क्रिय व भोंगळ कारभाराबाबत आज संताप्त नागरिकांनी चक्क ग्रामपंचायतला कुंपण घातले ऐन चतुर्थीतच स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज ग्रामपंचायतीस धडक दिली.

यावेळी एकही ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्याने ‘ सरपंचासह साऱ्यांनीच राजीनामा घ्यावा.!’ असा जोरदार सवाल करत उपस्थित नागरिकांनी घोषणाबाजी केली मळगाव ग्रामपंचायतीत अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. सहा महिन्यापासून स्ट्रीट लाईट बंद आहेत. ग्रामस्थांना अंधारातून चाचपडत जावे लागत आहे. फक्त लाईट कर गोळा करत आहेत. पिण्याचे पाणीचे बिल घेतले जाते, परंतु नळाला पाणीच येत नाही. रस्त्यांची तर अत्यंत दुरावस्था आहे. गटार तुंबलेले आहेत, गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढलेली आहेत. परिणामी वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. अशा अनेक समस्यांचा पाढा ग्रामस्थांनी उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांच्यासमोर वाचला यावेळी श्री पेडणेकर ग्रामस्थांच्या रोषाला एकटे सामोरे गेले.

यावेळी मळगाव येथील पांडुरंग राऊळ, बाप्पा नाटेकर, ॲड. निधी दाभोळकर, महेंद्र पेडणेकर, गुरुनाथ गावकर, विलास मळगावकर, गुरुनाथ नार्वेकर, सिद्धेश तेंडुलकर, विश्वनाथ गोसावी, बाळा बुगडे, निलेश राऊळ, प्रेमनाथ राऊळ, लाडू जाधव ,संजय जाधव, महेश शिरोडकर, मयूर गावकर, ज्ञानेश्वर राऊळ लाडकोबा गावकर उल्हास मांजरेकर राजेश राऊत राकेश राऊळ ज्ञानेश्वर मळगावकर दिलीप कानसे शंकर राऊळ, दीपक मळगावकर, महेश राऊळ, सोना गावकर, राजू नाईक, दिनेश नाईक, पांडुरंग नाटेकर, राजाराम शिरोडकर, सुधाकर तेली, अमोल सावळ, प्रितेश दाभोळकर, सुधाकर नाईक, प्रणव सावळ, कांता सावळ, जयेंद्र जाधव, जयराम राऊळ, विलास जाधव, दीपक जाधव, समीर हरमलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!