18.4 C
New York
Wednesday, April 30, 2025

Buy now

एकाची गळफास लावून एकाची आत्महत्या 

सावंतवाडी : तळवडे येथे एका वृध्दाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. सुरेश यशवंत कुंभार (वय ६५, रा. तळवडे-कुंभारवाडी) असे त्याचे नाव आहे. आत्महत्या मागे मागचे नेमके कारण कळू शकले नाही. याबाबतची खबर त्याचा मुलगा यशवंत कुंभार यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार यातील मृत सुरेश यांची मासिक स्थिती १५ दिवसांपूर्वी बिघडलेली होती. त्यामुळे ते घरात कोणाला न सांगता निघून गेले होते. दरम्यान आज सकाळी राहत्या घराच्या एका खोलीमध्ये त्यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!