कणकवली : माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यावर विराजमान श्रीगणेशाचे दर्शन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतले. आमदार नितेश राणे यांनी संदेश सावंत समीर नलावडे यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे स्वागत केले. लोकसभेच्या अत्यंत महत्वपूर्ण लढतीत ठाकरे सेनेला कोकणातून हद्दपार करत खासदार नारायण राणे यांनी विजय मिळवला होता. राणेंच्या या ऐतिहासिक विजयाचे संदेश सावंत समीर नलावडे हेही शिलेदार होते. या विशेष राजकीय विजयानंतर प्रथमच आलेली गणेशचतुर्थी गमेशभक्त असलेल्या संपूर्ण राणे कुटुंबियांसाठी आनंददायी अशीच आहे. या गणेशचतुर्थीत मुंबई जुहू येथे अधिश बंगल्यावर जात सावंत नलावडे यांनी राणे कुटुंबियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नाटळ सरपंच सुनील घाडीगांवकर, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, कुंभवडे उपसरपंच सुशांत सावंत, बबन सावंत, राज नलावडे, ऋतिक नलावडे, शुभम बांदेकर उपस्थित होते.