24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

बेपत्ता खलशाचा मृतदेह सापडला | तो मृतदेह खलाशी नितीन कणेरकर यांचा

देवगड : समुद्रात ३१ मार्च रोजी मच्छिमारी साठी गेलेली बोट बसत असल्याने बोटीवरील आठ खलाशांनी समुद्रात उडी घेतली होती. त्यातील सात खलाशी सुखरूप बाहेर काढले परंतु त्यातील एक खलाशी नितीन जयवंत कणेरकर हा बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरू होता. आज मंगळवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास १२ वाव पाण्यात त्याचा मृतदेह सापडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,देवगड बंदरातील तुषार दिगंबर पारकर यांची विशाखा. ही मच्छीमारी नौका रविवार दिनांक ३१ मार्च रोजी पहाटे दुर्घटनाग्रस्त झाली होती . समुद्रात मच्छीमारी जात असताना १० वाव पाण्यात अचानक नोकेच्या तळाच्या जोईंडच्या फटीतून पाणी येऊ लागल्याने नौका बुडाली. नोके पाणी शिरून ती बुडत असल्याचे लक्षात येतात जीव वाचविण्यासाठी नौकेवरील तांडेल व खलाशी यांनी तात्काळ पाण्याची कॅन रिकामी करून ती रिकामी कॅने घेऊन समुद्राच्या पाण्यात उडी मारल्या. त्याच दरम्यान समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेली अनंत तारकर यांच्या इंद्रायनी नौकेवरील तांडेल व खलाशांनी बुडत असलेल्या विशाखा नौकेवरील तांडेल व खलाशी यांना पाण्यातून नौकेवर घेऊन वाचविले होते .मात्र यातील एक खलाशी नितीन कनेरकर यांच्या हातातील कॅन निसटल्याने तो पाण्यात बेपत्ता झाला होता.

नौका मालक हे त्याच्या शोध इतर नौकांच्या सहाय्याने तसेच पोलीस गस्ती नौकेच्या सहाय्याने गेले दोन दिवस शोध घेत होती. अखेर मंगळवारी २ एप्रिल रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास त्याचा शोध घेणाऱ्या नौका मालक तुषार पारकर यांच्या नौकांना समुद्रात १२ वाव पाण्यात त्याचा मृतदेह मिळाला. मृतदेहाचा पंचनामा करून सायंकाळी देवगड ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेच्या अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय शिरगावकर करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!