13 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

संदेश उर्फ गोट्या सावंत वाढदिवस विशेष…..

वाढदिवस सर्वसामान्यांच्या आधारस्तंभाचा ; वाढदिवस भिरवंडे गावच्या सुपुत्राचा

कणकवली | मयुर ठाकूर : सिंधुदुर्ग जिल्हयात कार्यकर्तृत्वाने आपले नाव कोरणारे व्यक्तिमत्व म्हणजेच श्री. संदेश सावंत..!

कुटुंबियांसमवेत श्री. संदेश सावंत

समाजकारणाची आवड असणारे संदेश उर्फ गोट्या सावंत यांचे नेतृत्‍व विद्यार्थी दशेतच उदयाला आले. चांगल्‍याशी चांगले तर कुणी अन्याय करत असेल तर त्‍याविरोधात दणदणीत आवाज उठवून अन्यायाचा बिमोड करणे हा त्यांचा खाक्‍या. समाजातील गोरगरीबांची कामे प्राधान्याने व्हावीत, त्‍यांना न्याय मिळावा यासाठी नेहमीच तत्‍पर असल्‍याने श्री. सावंत हे अल्‍पावधीतच तळागाळातील सामान्य जनतेचा नेता म्‍हणून उदयास आले. तत्‍कालीन शिवसेनेतील शाखाप्रमुख ते जिल्‍हा परिषद अध्यक्ष अशी महत्‍वाची पदे श्री. सावंत यांनी भूषवली. मात्र, ही पदे भूषविताना सर्वसामान्य जनतेची कामे वेगाने व्हावीत. गावातील नळपाणी, रस्ते, वीज व्यवस्था व्हावी यासाठीही त्‍यांनी आग्रही भूमिका घेतली नव्हे तर ही कामे करून दाखवली. प्रशासनावरही त्‍यांची पकड असल्याने आजवर आपल्‍या मतदारसंघात सर्वाधिक निधी आणला. श्री. सावंत यांच्या मतदारसंघात कुठलीही आपत्ती येवो अथवा कुणावरही कसलेही संकट येवो, ते निवारण्यासाठी दुसऱ्या क्षणी श्री. सावंत तेथे पोचलेले आहेत. त्‍यामुळे सह्याद्रीच्या खोऱ्यातच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचा आदर्श घेऊन अनेक युवक, तरूण मंडळी समाजामध्ये काम करत आहेत. ‘देऊ तो शब्‍द पूर्ण करू’ हे त्‍यांच्या व्यक्तिमत्वाचे खास वैशिष्‍ट्य. याच गुणामुळे त्‍यांनी गावागावात विकासाची गंगा आणली.

श्री. संदेश सावंत यांनी तळागाळातील सामान्य जनतेचा तारणहार म्हणून अल्पावधीतच लोकांच्या गळ्यातील ताईत बनून प्रत्येक गावामध्ये आपल्या कार्यकौशल्याद्वारे विकास घडवून आणला. आजही अनेक तरूण युवक त्यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये काम करत आहेत. ‘देवू तो शब्द पूर्ण करु’ हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खास वैशिष्ट्य! जिल्हयाच्या शैक्षणिक गुणवत्तेतही श्री. संदेश सावंत यांच्या कार्याचा मोठा वाटा आहे.

भिरवंडे गावच्या या सुपुत्राला लहानपणापासूनच लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याची सवय. त्यामुळेच ते सर्वांना आपलेसे वाटतात. गरजेच्यावेळी स्वतःची कामे बाजूला ठेवून दुसऱ्यांना मदत करणारे श्री. सावंत अनेकांच्या कुटुंबातील एक सदस्य बनून राहीले आहेत. ते राबवत असलेले उपक्रम हे भव्यदिव्य असेच असतात. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमास माणसे गोळा करण्याची गरज लागत नाही. तर आपसूक माणसे गोळा होऊन कार्य सिद्धीस जाते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी ते देवमाणूसच वाटतात. समाजातील गोरगरीब जनतेचा विकास करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. हे त्यांच्या कार्यातूनच दिसून येते.

त्यांच्या अवतीभवती नेहमीच लोकांचा गराडा असतो. त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संजना सावंत यांचाही मोलाचा वाटा असतो. गोरगरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे शैक्षणिक क्रांती निर्माण व्हावी, यासाठी युवा संदेश प्रतिष्ठान, नाटळ सांगवे या माध्यमातून अनेक स्तुत्य उपक्रम दरवर्षीच राबविले जातात. रक्तदान शिबीर, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, निबंध स्पर्धा, चित्रकला, व्हॉलीबॉल, ज्येष्ठांना देवदर्शन असे अनेक उपक्रम राबविले जातात. यासाठी पदरमोड करून समाजाप्रती असणारं आपलं कर्तव्य कार्यातून सिद्ध करतात. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या प्रथम क्रमांकावर आहे. मध्यंतरी युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्षक, अधिकारी यांचे एकत्रितरित्या चर्चासत्रही घेण्यात आले. तसेच डिजीटल शाळांचे महत्त्व ओळखून एक कार्यशाळाच कणकवलीत आयोजित केली. याचा सर्वांनाच मोठा फायदा झाला. त्यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेतही सावंत यांच्या कार्याचा मोठा वाटा आहे. त्यात प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्यासह आर्थिक सहाय्य केले जाते. यात आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी त्यांची भावना असते. सार्वसामान्यांचा पाठीराखा असेही त्यांना म्हटले जाते. जीवनात स्वकर्तृत्वाने यशोशिखर गाठणारे संदेश सावंत यापुढेही यशाचे उत्तुंग शिखर गाठतील यात शंकाच नाही.

      महिलांसाठी सातत्‍याने रोजगाराभिमुख उपक्रम

संदेश सावंत आणि त्‍यांच्या सौभाग्‍यवती संजना सावंत यांनी युवा संदेश प्रतिष्‍ठानच्या माध्यमातून महिलांच्या सशक्‍तीकरणासाठीही सातत्‍याने उपक्रम सुरू ठेवले आहेत. यात दरवर्षी प्रतिष्‍ठानमार्फत महिलांसाठी हस्तकला आणि इतर साहित्‍य निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. त्‍याचरोबर बचतगटांतील महिलांसाठी सातत्‍याने रोजगाराभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. ज्‍येष्‍ठांसाठी सातत्‍याने आरोग्‍य शिबिरे, त्यांना योग्‍य ते उपचार मिळावेत, मोफत औषधोपचार मिळावा यासाठीही युवा संदेश प्रतिष्‍ठानच्या माध्यमातून सातत्‍याने आरोग्‍य शिबिरे घेतली जात आहेत. यात ज्‍येष्‍ठांची आरोग्‍य तपासणी आणि औषधोपचार केले जातात. त्याचप्रमाणे सातत्‍याने मोफत मोतिबिंदू शिबिर आयोजित करून अनेक ज्‍येष्‍ठांना नवी दृष्‍टी देण्याचे महत्‍वपूर्ण काम केले जात आहे.

संदेश सावंत हे कुठल्‍याही मतदारसंघात गेले तरी ते तेथील सामान्य जनतेची कामे करण्याचा आधी प्राधान्य देतात. त्‍यामुळेच नाटळ जिल्‍हा परिषद मतदारसंघ असो अथवा कणकवली शहरालगतचा कलमठ मतदारसंघ असो, या दोन्ही मतदारसंघात त्यांनी विक्रमी मतांनी विजयी होण्याचा इतिहास रचला. त्‍यामुळेच आजवर राजकारणात कोणाचीही लाट असो अथवा नसो श्री. सावंत यांचा विजय हा निश्‍चित असतो. २०१८ मध्ये कणकवली नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. त्‍यावेळी नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष विरोधात इतर सर्व राजकीय पक्ष अशी लढत होती. त्‍यामुळे या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी श्री. सावंत यांच्याकडे सोपविण्यात आली होती. श्री. सावंत यांनी सर्व १७ प्रभाग पिंजून काढले. अतिशय मायक्रोप्लानिंग केले आणि एकूण १७ पैकी ११ स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आणि नगराध्यक्षही निवडून आणून दाखवला. कणकवली शहरातील एका प्रभागात तर स्वाभिमानचा उमेदवार निवडून येण्याची सूतराम शक्‍यता नव्हती. पण, सावंत यांनी अशक्‍य ते शक्‍य करून दाखवले आणि राजकारणातील किंगमेकर हे सिद्ध करून दाखवले……आजच्या वाढदिनी लाख-लाख शुभेच्छा !

– संपादक, मयुर ठाकूर ( कणकवली ) 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!