31.6 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची बदली

अनिल पाटील नवे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग चे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची महाराष्ट्र राज्य फार्मिंग कार्पोरेशन पुणेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली झाली असून, हाफकिन चे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांची सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. किशोर तावडे यांनी 23 ऑगस्ट 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या कालावधीत भारतीय नौसेना दिन मालवण मध्ये साजरा करण्यात आला होता. तसेच राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ही बांधण्यात आला होता. मात्र छत्रपतींचा हा पुतळा अगदी पावणे नऊ महिन्यातच कोसळला होता. त्याचा वादंग अद्यापही संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. या दुर्घटनेवरून राज्य सरकारला विरोधकांनी चांगलेच कोंडीत पकडले आहे. तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही थेट मेडिया समक्षच जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या प्रशासकीय कारभारावर तावडे यांच्या उपस्थितीमध्येच उघड नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तावडे यांची झालेली तडका फडकी बदली हा चर्चेचा विषय बनला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!