26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास परवानगी द्या

सा.बा. चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची अधीक्षक अभियंत्यांकडे मागणी

कणकवली : वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाची गेली वर्षभर व सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण येथे झालेल्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या हॅलीपॅडच्या बांधकामाबाबत तक्रार करणा-या परशुराम उपरकर, माजी विधानसभा सदस्य यांच्या विरुदध कायदेशीर गुन्हा नोंद करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी अधीक्षक अभियंता रत्नागिरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ४ डिसेंबर २०२३ रोजी नौसेना दिन सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण येथील समुद्र किनारी आयोजीत करण्यात आला होता. सदरील कार्यक्रमासाठी पंतप्रधान, संरक्षण मंत्री, केंद्रिय मंत्री भारत सरकार, राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रीमंडळातील अन्य मंत्रीगण, महाराष्ट्र राज्य अशी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

यानिमीत्ताने मालवण येथे विविध ठिकाणी एकूण ११ हॅलीपॅड उभारण्यात आली होती. त्याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे. बोर्डीग ग्राऊंड मैदानावर ३ डांबरी पृष्ठभागाची, २. कुंभारमाठ येथे शासकिय तंत्रनिकेतन नजीक 3 कॉक्रीट पृष्ठभागची व 2 डांबरी पृष्ठभागाची, ओझर येथे 3 डांबरी पृष्ठभागाची, वरील सर्व हॅलीपॅड अतिमहनीय व्यक्तींच्या आगमन निर्गमनासाठी पक्क्या स्वरुपाची (पृष्ठभागाची) तत्कालीन वरीष्ठ अधिकारी, पंतप्रधान यांचे सुरक्षा रक्षक, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले आहे. यासाठी सक्षम स्तरावरुन मान्यता प्राप्त करुन घेण्याची कार्यवाहीसुदधा प्रचलीत शासकिय धोरणानुसार करण्यात आली आहे.

तथापी कणकवली येथील परशुराम उपरकर, माजी विधानसभा सदस्य हे सातत्याने सार्वजनीक बांधकाम विभाग व व्यक्तीशः माझ्याबददल चुकीची व गैरसमज करुन देणारी माहिती प्रसार माध्यमांदवारे गेली वर्षभर पसरवीत आहेत असा आरोप सर्वगोड यांनी केला आहे. मागील सुमारे वर्षभरापासून त्यांचे या कार्यालयास सुमारे ६० हून अधिक माहिती अधिकार अधिनियम सन २००५ अन्वये माहिती मागणेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे ज्या अर्जावर अगोदर माहिती देण्यात आली आहे. त्याविषयाबाबत पुन्हा माहिती मागण्याचे अर्जही यामध्ये आहेत. वारंवार माहिती अधिकाराचा गैरवापर करुन जिल्हयातील विविध विभागचे अधिकारी व कर्मचारी यांना दुष्ट हेतु ठेऊन नाहक मानसिक त्रास देणे व मनस्ताप होईल अशा प्रकारची या जिल्ह्यामध्ये नित्य नियमाने माहिती मागविणे असे प्रकार श्री. परशुराम उपरकर, माजी विधानसभा सदस्य यांच्याकडून सातत्याने सुरु आहेत. २६/०८/२०२४ रोजी राजकोट येथे नौसेना विभागामार्फत उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून पडल्यानंतर श्री. परशुराम उपरकर, माजी विधानसभा सदस्य हे सातत्याने सार्वजनीक बांधकाम विभाग व व्यक्तीशः माझ्यावर नाहक विविध चुकीचे निराधार मोघम आरोप करुन या घटनेशी माझा थेट संबंध जोडून त्याला मला जबाबदार धरत आहेत. ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे. वास्तविक सदरील पुतळा व त्याखालील चबुतरा बांधकाम हे नौसेसा विभागाकडून विभागाकडून करण्यात आले आहे. याची माहिती सर्व कागदपत्रांसह शासनाकडे व प्रसार माध्यमांकडे आहे. रविंद्र चव्हाण, मंत्री सा. बा. विभाग यांचे स्वीय सहाय्यक श्री. अनिकेत पटवर्धन यांचेशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना, केवळ आकसापोटी त्यांचे व माझे संबंध जाणीवपूर्वक जोडून राजकीय रंग देऊन समाजमन बिघडवत आहेत व शासनाची प्रतिमा मलिन करत आहेत. वास्तविक लोकप्रतिनिधी म्हणून जनहिताची कामे जिल्हयात असणा-या अधिका-यांकडून करून घेऊन सामान्य जनतेला न्याय देणे व शासनाच्या विविध योजनांचा वापर करुन अधिका-यांकडून जनहिताची कामे करुन घेणे अशा प्रकारची भूमिका न ठेवता श्री. परशुराम उपरकर, हे सातत्याने बदनामीकारक वाक्यरचना करुन सार्वजनीक बांधकाम विभागची व व्यक्तीशः माझी प्रतिमा मलीन करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

यामुळे मोठ्या प्रमाणात माझी व शासनाची बदनामी करत आहे, राजकारण करत आहेत. शासनाची प्रतिमा मलिन करत आहे व जनमानस बिघडविण्याचा प्रकार होत असलेला दिसून येत आहे तरी त्यांचे विरुदध कायदेशिर कार्यवाही करण्यासाठी किंवा कायदेशिर गुन्हा दाखल करण्यासाठी रितसर परवानगी मिळण्यास विनंती आहे अशी मागणी श्री सर्वगोड यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!