3.6 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

मालवण राजकोट येथील पुतळा कामाची माजी आ. परशुराम उपरकर यांनी केली पोलखोल

सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांसह बांधकामाच्या कार्यकारी अभियंत्यांवर केली टीका 

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणाऱ्या जयदीप आपटे यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा केला आरोप

कणकवली : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणात अनेक राजकीय पक्षाचे नेते येवून गेले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जाहीर रित्या माफी मागीतली. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही माफी मागीतली नाही. पेशवे शाहीच्या माध्यमातून हे सगळे चालू आहे. त्यामुळेच या प्रकरणात दोषी असलेले पालकमंत्री, कार्यकारी अभियंता, मुर्ती बनवणारा ठेकेदार जयदीप आपटे या व्यक्तींकडे दुर्लक्ष केला जातो. पालकमंत्र्यांचे सचिव अनिकेत पटवर्धन, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी. अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.

राजकोट लोकार्पनासाठी हॅलीपॅड बनवण्याची निविदा होण्याआधी कार्यारंभ आदेश कसा दिला ? असा सवालही त्यांनी केला. कणकवली येथील आपल्या कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, छत्रपतींच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या विषयावर बोलताना कपाळावर खुण दाखवण्यात आली. त्या खुणेबाबत कृष्णाजी कुलकर्णी हा अफजल खान यांचा वकील होता, अफजल खान चा कोथळा काढला तेव्हा त्या वकिलाने महाराजांवर वार केला, ती खूण दाखवण्याचा प्रयत्न शिल्पकार जयदीप आपटे यांनी केला. मुळात जयदीप आपटे कडे कुठलीही डिग्री नाही. जे.जे. आर्टस मध्ये तो शिकलेला नाही. त्याला कोण पाठीशी घालत आहे. ? त्याला कोणी लपवले आहे ? असा सवाल परशुराम उपरकर यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना झाल्यानंतर अजयकुमार सर्वगोड गायब झाले आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई होण्याची गरज होती. बांधकामचे अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता यांनी संगनमताने हा घोळ केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्री, पालकमंत्री फक्त एकदाच येवून गेले ही खरी शोकांतिका आहे. कार्यक्रम होण्यापूर्वी पालकमंत्री पुढे पुढे नाचत होते, ते कुठे आहेत ? पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. कार्यकारी अभियंत्याचे निलंबन करावे. पालकमंत्र्यांचा सचिव अनिकेत पटवर्धन याने हे सगळं केलं आहे. त्याची चौकशी झाली आहे. या घटनेत एकाबाजूने माफी मागायची दुसरीकडे कुठलीही कारवाई नाही. ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याची टीका परशुराम उपरकर यांनी केली.

नव्याने पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची गरज होती. आता शासन जागे होवून वयस्कर असलले धुळ्यातील शिल्पकार श्री. सुतार यांना आणून त्यांना पुतळा उभारण्यात काम दिले जात आहे, ते जागतिक कीर्तीचे असल्याने ते वर्षभर तरी पुतळा उभारण्यासाठी वेळ घेतील. असेही श्री. उपरकर यांनी सांगितले.

आधी ” वर्क ऑर्डर नंतर निविदा ” बांधकामचा अजब कारभार

कणकवली सार्वजनिक विभागामार्फत राजकोट येथील छत्रपतींच्या पुतळा लोकार्पन व नौदल दिनाच्या निमित्ताने व्हीआयपी व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेल्या हॅलीपॅडची निविदा व अनामत रक्कम घेण्याच्या तारखांमध्ये फरक आहे. काम करण्यासाठी वर्क ऑर्डर संबंधित ठेकेदाराला निविदा प्रक्रिया पूर्ण होण्या अगोदरच देण्यात आली. हा बांधकाम विभागाचा अजब कारभार आहे. तसेच निविदेच्या 33 टक्क्यांच्या प्रमाणात कामांचे वाटप करताना जी कामे मजुर संस्थांना द्यावयाची होती. त्या कामांबाबत जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांना पत्रव्यवहार न करताच बांधकाम विभागाने 50 लाखांच टेंडर देण्याच काम केल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!