10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

कुसूर येथे साडेचार लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त 

वैभववाडी पोलिसांची कारवाई 

वैभववाडी : गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा टेम्पो वैभववाडी पोलिसांनी पकडला आहे. तब्बल ४ लाख ६५ हजाराची दारू जप्त केली आहे. ही कारवाई कुसूर येथे ३.३० वाजता करण्यात आली आहे. दारूची वाहतूक करणाऱ्या प्रताप लक्ष्मण कोकरे रा. कुडाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. टेम्पोमध्ये ११० दारुचे बाॅक्स आढळून आले आहेत. सदर बॉक्स नारळाच्या पोत्या आड लपवून ठेवण्यात आले होते.

ही कारवाई वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलीस कर्मचारी हरेष जायभाय, अजय बिलपे, रणजीत सावंत यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!