तब्येत खालावली ; उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले
कणकवली : जाणवली येथील एका शाळकरी विद्यार्थ्यांनी पोटात दुखत असल्याने औषध म्हणून चुकून फिनेल प्याल्याची घटना आज घडली. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिला उपचारासाठी येथील कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र फिनेल पिल्यामुळे ती बेशुद्ध झाली होती. त्यामुळे तिने नेमके किती प्रमाणात फिनेल प्याले हे समजू शकले नाही. तिच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, केलेल्या उपचारांना योग्य साथ मिळत नसल्यामुळे तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.