महाविकास आघाडीची मागणी ; कुडाळ निरीक्षकांना निवेदन
कुडाळ : राजकोट येथील छत्रपतींचा पुतळा कोसळण्यामागे विरोधकांचा हात आहे. असे विधान करणाऱ्या भाजप नेते अतुल काळसेकर यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून आज कुडाळ पोलिसांकडे करण्यात आली.
दरम्यान याबाबत काळसेकर यांच्याकडून काही पुरावे असतील तर त्यानुसार चौकशी किंवा त्यांनी खोडसाळ विधान केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, शिवाजी घोगळे, प्रसाद रेगे, प्रकाश जैतापकर, अभय शिरसाट, संतोष शिरसाट, तरबेज शेख, अय्यास खुल्ली, अजीम खान, नझिर शेख, आत्माराम ओटवणेकर, लालू पटेल, प्रसाद सावंत-भोसले आदी उपस्थित होते.