1.1 C
New York
Thursday, February 12, 2026

Buy now

कानून के हात और राणे साहब की पहोंच बहुत लंबी है भैया!

सिने अभिनेता सोनू सूद यांच्या डायलॉग बाजीवर प्रेक्षक खुश

कणकवली : कणकवली येथे आमदार नितेश राणे पुरस्कृत दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक कलाकारांची उपस्थिती होती. दरम्यान यावेळी सिने अभिनेता सोनू सूद यांनी उपस्थिती लावून डायलॉग बाजीकरत अनेकांची मने जिंकली. “कानून के हात और राणे साहब की पहोंच बहुत लंबी है भैया….!” मित्रांनो तुमच्या चेहऱ्यावर जी खुशी आहे या मागे खासदार नारायण राणे यांचा हात आहे. खा. नारायण राणे, माजी खा. डॉ. निलेश राणे, आ. नितेश राणे हे आमच्या परिवारातील सदस्यांपैकीच आहेत. जेव्हा मला कार्यक्रमाच निमंत्रण मिळालं तेव्हा एवढा आनंद झाला की आपण सिंधुदुर्गमध्ये दहीहंडी उत्सवानिमित्त जाणार आहोत, यापेक्षा अजून कोणत भाग्य नाही. काही वर्षांपूर्वी देखील मी इकडे आलो होतो. पुन्हा एकदा येण्याचा योग आला, हे खरंतर आ. नितेश राणे व माजी. खास. निलेश राणे या दोन भावांमुळेच मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो.! आताचं या ठिकाणचे चित्र पाहून आपल्याला याच ठिकाणी राहावंसं वाटत आहे. या ठिकाणी राहून आपण सणांच्या निमित्त घेत असलेली मज्जा आपल्याला देखील घेता यावी असे वाटत आहे. दहीहंडी फोडण्याच ट्रेनिंग घ्यावे लागले तरी चालेल पण एक ना एक दिवस नक्की हे दहीहंडी फोडण्याच ट्रेनिंग घेईन अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!