15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणातील स्ट्रक्चरल सल्लागार पोलिसांच्या ताब्यात ; चेतन पाटील कुठे सापडला

सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ४ दिवसांपूर्वी कोसळला. यानंतर पुतळ्याचं स्ट्रक्चरल कन्सल्टंट असलेला चेतन पाटीलवर गुन्हा दाखल झाल्यापासूम फरार होता. मात्र आज (३० ऑगस्ट) मध्यरात्री तीनच्या सुमारास कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकणाच्या पुढील तपासासाठी त्याला मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे

मालवण येथे महाराजांचा पुतळा कोसळला

चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक कोसळला. यानंतर अनेक शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या तर सरकार विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन व्हावं यासाठी पुतळा गडबडीत उभा केला तसेच भ्रष्टाचार करण्यात आला असे अनेक आरोप सरकारवर करण्यात येत आहेत. तर पुतळा वाऱ्यामुळे पडला आणि याचे काम नेव्हीकडे देण्यात आले होते, असे म्हणत सरकारकडून भारतीय तटरक्षक दलावर खापर फोडण्याचा प्रयत्न होत आहे.

याप्रकरणी ठाण्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि चबुतराचे काम केलेले आणि सल्लागारपदी काम करणारे कोल्हापूरचे चेतन पाटील या दोघांवर हेतुपुरस्सर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात

यानंतर दोन दिवसांपूर्वी मालवण पोलिसांनी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठेत राहणारा चेतन पाटील याचा घरी ताब्यात घेण्यासाठी पोचले असता चेतन पाटील फरार होता. तर दुसरीकडे शिल्पकार जयदीप आपटे देखील फरार आहे. दोन दिवसांपासून चेतन पाटील याचे लोकेशन पुणे येथे दाखवत होतं. मात्र, काल रात्री तीनच्या सुमारास चेतन पाटील याचे लोकेशन कोल्हापूर दाखवल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्वरित हालचाली करत चेतन पाटील याला ताब्यात घेतले. मालवण पोलिसांच्या हाती पुढील कारवाईसाठी सुपूर्द केले आहे. एकीकडे चेतन पाटील पोलिसांच्या हाती लागला असला तरी या प्रकरणातील ठाण्याचा शिल्पकार जयदीप आपटे अद्याप फरार असल्याने चेतन पाटील यांच्याकडून पुढील माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!