पहिल्या दिवशी रक्तदान शिबिराने पुढील आयोजित कार्यक्रम सुरू
कणकवली | मयुर ठाकूर : युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवारी ( आज ) विविध कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे. आज सकाळी ९:०० वा रक्तदान शिबिराने पहिली सुरुवात करण्यात आली. कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे आयोजित रक्तदान शिबिरात ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी रक्तदात्यांना व रक्तदानसाठी मदत करणा-या रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संदेश ऊर्फ गोट्या सावंत, संजना संदेश सावंत, विजय भोगटे, सरपंच संजय सावंत, सुनिल गावकर, संतोष गावकर, सानिका गावकर, मयुरी मुंज, मिलन पवार, प्रफुल्ल काणेकर, संजय सावंत, अनिल पांगम, नितीन गावकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे आज ( मंगळवारी ) रात्रौ ९ वा दशावतारी नाटक, श्री वेतोबा (चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण, मालक – देवेंद्र नाईक) स्थळ- समाधी पुरुष हॉल कनेडी येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमांना उपस्थित राहू सहभाग दर्शवावा असे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी केले आहे.