21.6 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

व्यवसाय उभारणीसाठी चौधरी यांना तालुका व्यापारी संघ सर्वतोपरी सहकार्य करेल ; तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर

 त्या दुकान व्यवसायिकला दिलासा

कणकवली | मयुर ठाकूर : पटवर्धन चौकातील लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स मधील जयश्री मोबाईल शॉपी ला आग लागून ८ लाखांहून अधिक नुकसान झाले. दुकानमालक कृष्णा चौधरी यांची भेट घेत कणकवली तालुका व्यापारी संघ पदाधिकाऱ्यांनी चौधरी याना धीर दिला. पुन्हा व्यवसाय उभारणीसाठी चौधरी याना तालुका व्यापारी संघ सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, सचिव विलास कोरगावकर यांनी दिली. दुर्घटना घडल्यानंतर होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्व व्यापारी बांधवांनी आपल्या गोडाऊन तसेच दुकानातील वस्तूंचा विमा उतरवावा असे आवाहन यावेळी तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर यांनी केले.

यावेळी तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर , उपाध्यक्ष राजन पारकर, सहसचिव राजन राजाध्यक्ष, सचिव विलास कोरगावकर, प्रभाकर कोरगावकर, बंडू खोत, सुरभा गावकर, हेमंत गोवेकर संतोष काकडे, चन्द्रेश पहूजा, नंदू आळवे, अशोक करंबेळकर आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!