सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत. यावेळी ते राजकोट मध्ये जाऊन महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करणार आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ७ वाजता सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन, सकाळी ७.३० वाजता राजकोट ता. मालवण येथे आगमन व राखीव सकाळी ८.२५ वाजता सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे आगमन. सकाळी ८.३० वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.