गणेशोत्सव निमित्ताने नर्मदा आई संस्थेचा उपक्रम : संस्था अध्यक्ष संध्या तेरसे यांची पत्रकार परिषदेत माहिती..
कुडाळ : नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवसर उद्यापासून तीन दिवस ‘मी आत्मनिर्भर’ विशेष प्रदर्शन आणि खरेदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता या विक्री प्रदर्शनाचे उदघाटन होणार असून माजी खासदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष संध्या तेरसे यांनी दिली. यावेळी दीप्ती मोरे ऊपस्थित होत्या.
यावेळी माहिती देताना संध्या तेरसे यांनी सांगितले, आमची जी काही टीम आहे किंवा आमचे जे उद्योजक आहेत त्यांच्या खास आग्रहानुसार आपण यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा प्रदर्शन आणि खरेदी महोत्सव आयोजित केलेला आहे. त्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची संस्था गेली दोन महिने पंतप्रधान अन्नप्रक्रिया योजनेची जागृती महिला बचत गट किंवा महिलांच्या संस्थांमध्ये करते आहे. तर त्या जागृतीच्या वेळी आमच्या लक्षात आलं की वेळोवेळी जेव्हा आपण लोकांकडे जागृती करायला जातो तर त्याच्या पुढे काही होत नाही. लोक ऐकतात त्या ऐकतात आणि मग तिथेच बऱ्याचशा गोष्टी थांबतात. पण या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संस्थेने विचार केला की एखादी योजना जर पूर्णत्वास न्यायची असेल, तिथे एखाद्या उद्योग त्याच्यातून निर्माण व्हायचे असतील तर काय केलं पाहिजे. तर आमच्या संस्थेने असा विचार केला की एखादी योजना तिची माहिती देणार शासकीय जे कुठलं कार्यालय असेल त्याचे अधिकारी कर्मचारी त्याबाबतचा प्रोजेक्ट बनवणं त्याला लागणारी बँक त्याला लागणारी मशिनरी आणि त्याच्यातून निर्माण झालेले उद्योजक आणि त्यांना मिळणार मार्केट हे सगळं एका छताखाली आपण आणावं. म्हणजे ज्या नवोद्योजक काहीतरी करायची इच्छा आहे, अशांना त्याचा फायदा होईल.
शेतीमालावर होणारी प्रक्रिया करून अतिशय चांगले उद्योग आपल्या जिल्ह्यातील महिलांनी किंवा इतर संस्थांनी निर्माण केले आहे ते प्रत्यक्ष महिलांना तिथे बघायला मिळतील. त्याचबरोबर महिला उद्योग करताना आणि आपलं कुटुंब सांभाळताना आरोग्यही चांगलं राहावे म्हणून संस्थेच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर इथे आयोजित केलेला आहे आणि ते एक तारखेला रविवारी सकाळी नऊ ते एक या वेळात ते शिबीर होईल. सांडू फार्मस्युटिकल्स या कंपनीच्या सहकार्याने होणार आहे. तिथे मोफत रक्त तपासणी पण करण्यात येईल.
या सगळ्याबरोबर छोट्या मंडळींसाठी तयार माती पासून गणपतीची छोटी मूर्ती तयार करता येणार आहे. आजकाल शाडूच्या मातीची करायला जायला मुलांना वेळ नसतो पालकांना वेळ नसतो. तर आपण त्या शनिवारी म्हणजे उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 11 ते 1 या वेळामध्ये मुलांना तिथे येण्याच आवाहन केले आहे. तिथे त्यांना क्ले वगैरे सगळं पुरवून मुलांच्या कलागुणांना वाव देणार आहोत. हे असं करत असताना जास्तीत जास्त महिलांनी याच्यात सहभाग घ्यावा महिलांनी विरंगुळा पण असावं यासाठी पाककला स्पर्धा घेण्यात येणार आहे.
या सगळ्या बरोबरच कर्जाबाबत माहिती, इतर कुठल्याही योजना ज्या शासनाच्या उद्योग करण्यासाठी शासन सांगतं त्याचीही माहिती दिली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्योगाला लागणाऱ्या मशीन बाबतही आपल्या जिल्ह्यातलेच दोन तरुण माहिती देणार आहेत. जवळजवळ दहा ते पंधरा मशीन तिथे उपलब्ध होतील. या उपक्रमातन प्रेरित होऊन जास्तीत जास्त महिला उद्योजक असेल किंवा युवा उद्योजक असेल ते आपल्या जिल्ह्यातनं घडावे एवढीच आमच्या संस्थेची तळमळ आहे आणि ती तुमच्या सध्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावी असे आवाहन संध्या तेरसे यांनी यावेळी केले.
तीन दिवस रोज सकाळी आठ ते रात्री दहा अशी या प्रदर्शनाची वेळ आहे. उद्या त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होईल आणि दुसऱ्या दिवशी पाककला स्पर्धा असेल आणि तिसऱ्या दिवशी आरोग्य शिबिर आणि समारोप होईल. कुडाळच्या महालक्ष्मी सभागृहात हे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ३२ स्टॉल्स या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.
लखपती दीदी म्हणून जळगावला एक कार्यक्रम आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झाला. त्याच्यामध्ये आपल्याच तालुक्यातील अंदुर्ल्याची एक आपली आमची सहकारी तिलाही पारितोषक मिळालं . तर तिचाही तिथे गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तिचा स्टॉल असेल. ही आमच्यासाठी पण एक अभिमानाची गोष्ट आहे तर तिथेही आम्ही तिचा सन्मान करणार आहोत आणि या सगळ्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी ह्या उद्योजकांना सपोर्ट करावा. असे आवाहन संध्या तेरसे यांनी यावेळी केले.