11.9 C
New York
Sunday, November 3, 2024

Buy now

मालवणा येथून एक मोठी बातमी.! मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्याचा प्रयत्न

सतर्क असलेल्या प्रशासनानं परवानगी नसल्याने पुतळा पाठवला मागे 

सिंधुदुर्ग : राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळताच धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा या संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंधरा फुटी अश्वारूढ पुतळा ट्रक मधून घेऊन मालवणात दाखल झाले. प्रशासनाला याची माहिती मिळताच तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुतळा उभारण्यास प्रशासनाची परवानगी मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही माघारी परता असे आवाहन केले. त्यानुसार रात्री पोलीस बंदोबस्तात हा पुतळा मालवणातून रवाना करण्यात आला. दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री तहसीलदार यांना निवेदन देत आपल्या भावना व्यक्त केल्या. राजकोट किल्ला येथील महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या घटनेची प्रसारमाध्यम, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर काल रात्री औरंगाबाद येथून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ट्रकमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा घेऊन मालवणात दाखल झाले. ते शहरातील वायरी येथे आले असल्याची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमी, भाजपचे शहराध्यक्ष बाबा मोंडकर हे दाखल झाले. त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसही वायरी येथे दाखल झाले. त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुतळा असलेल्या ट्रकसह पोलीस ठाण्यात येत माहिती देण्यास सांगितले. त्यानुसार संघटनेचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले.

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वर्षा झालटे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे हेही दाखल झाले. तहसील कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष बाळराजे आवारे यांच्याशी तहसीलदार झालटे यांनी चर्चा केली. यावेळी तहसीलदारांनी संघटनेच्या पदाधिकऱ्यांना तुम्ही येथे पुतळा घेऊन येण्यापूर्वी प्रशासनाशी संपर्क साधणे गरजेचे होते. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. मात्र या गोष्टींना परवानगी वरिष्ठ स्तरावून होते. तसेच या प्रकरणाची चौकशीची प्रक्रिया सुरू होणार असल्याने तुम्हाला महाराजांचा पुतळा उभारण्याची परवानगी प्रशासनाकडून देता येणार नाही. त्यामुळे तुम्ही या पुतळ्यासह माघारी परतावे असे स्पष्ट केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!