11.9 C
New York
Sunday, November 3, 2024

Buy now

बांदा पुरग्रस्तांची नुकसान भरपाई खात्यात वर्ग

खास.नारायण राणे यांचे वेधण्यात आले होते लक्ष 

उर्वरित नुकसान ग्रस्तांना चतुर्थी पुर्वी मिळणार भरपाई

बांदा : बांदा शहरातील पूरग्रसतांच्या नुकसान भरपाई संदर्भात खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधण्यात आल्याने आतापर्यंत २१० जणांना भरपाईची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तसेच उर्वरित ४० जण व १५१ दुकान गाळे धारक यांनी शॉप ऍक्ट परवाना जमा केल्यावर गणेश चतुर्थीपूर्वी पैसे खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे आश्वासन महसूल विभागाने दिले असल्याची माहिती भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी दिली आहे.

यासंदर्भात त्यांनी महसूल अधिकारी समर्थन पेठे यांची भेट घेऊन माहिती घेतली. सावंतवाडी तालुक्यात एकूण ३६६ पुरबाधित नुकसानग्रस्त आहेत. त्यापैकी बांदा शहरातील २५० घरकुल वाले आहेत. जावेद खतीब यांनी वारंवार ग्रामस्थानसह पाठपुरावा केल्याने आतापर्यंत २१० जणांना नुकसान भरपाई खात्यात थेट वर्ग करण्यात आली. अजूनही ४० लाभार्थी हे भरपाईपासून वंचित आहेत. तसेच १५१ लाभार्थी हे शहरातील दुकान मालक आहेत. महसूल विभागाने यासाठी शॉप ऍक्ट परवाना हा बंधनकारक केला आहे. यासंदर्भात श्री खतीब यांनी खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे महसूल विभागाने तात्काळ पैसे खात्यात वर्ग केलेत.

ज्यांनी शॉप ऍक्ट परवाना जमा केला नाही त्यांनी तो तात्काळ महसूल विभागाकडे जमा करावा. गणेश चतुर्थीपूर्वी पैसे खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे खतीब यांनी सांगितले. घरकुल नुकसानग्रसतांपैकी काही लाभार्थ्यांना ५० टक्के रक्कम वर्ग करण्यात आली आहे. यासंदर्भात श्री खतीब यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याशी चर्चा केली असून येत्या दोन दिवसात यासंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन तहसीलदार पाटील यांनी दिल्याचे खतीब यांनी सांगितले.

यावेळी बांदा उपसरपंच बाळु सावंत, मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, गुरुनाथ सावंत, संदीप बांदेकर, सुधाकर बांदेकर, दिलीप बांदेकर, निलेश सावंत, प्रदीप सावंत, मोनाली कुबडे, शैलेश कुबडे, शामू धुरी, राजेश विरनोडकर, प्रशांत पांगम आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!