एकमेकांवर दगडफेक; तणावस्थ परिस्थिती परिसरात कडेकोट बंदोबस्त
मालवण : राजकोट येथे कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे व नारायण राणे यांच्या समर्थकात राडा झाला. एकमेकावर दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. यात एक पोलीस व महिला जखमी झाली. त्या ठिकाणी उग्र स्वरूप प्राप्त झाले. दरम्यान दोन्ही नेते आमने-सामने आल्यामुळे त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर परिसरात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. काही झाले तरी माघार घेणार नाही, यावरून दोन्ही गट ठाम आहेत. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. यात मध्यस्थी काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील करत आहेत. मात्र त्यांना अपयश येत आहे.