6.5 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

शिवरायांचा पुतळा पंचधातुचा नाही – आमदार वैभव नाईक यांची माहिती

राजकोट किल्ल्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

कणकवली : मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कामत कामात भ्रष्टाचार झाला आहे. पालकमंत्र्यांनी बगलबच्छा कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी या एवढ्या मोठ्या कामाची ६ मजुर संस्थांना २५ – २५ लाखांची कामे दिली. त्याच धर्तीवर आपटे नामक ठेकेदाराला छत्रपतींचा पुतळा उभारण्याचे काम अनुभव नसताना पालकमंत्र्यांनी दिले. उभारण्यात आलेला छत्रपतींचा पुतळा हा पंचधातूचा नाही हे कोसळल्यामुळे काल सिध्द झाले आहे. खरतर या सरकारला दर्जेदार उभारुन किल्ल्याचे सुशोभिकरण करायचे असते तर एकच चांगला ठेकेदार दिला असता, मात्र या कामात मोठा भ्रष्टाचार सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेला आहे. त्यामुळे या घटनेची जबाबदारी स्विकारुन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे शिवसेना आ. वैभव नाईक यांनी केली आहे.

कणकवली येथील विजय भवन येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबाबत नौदल विभागाची तक्रार करण्यात आली आहे. जे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकाच रजिस्टरला नोंदवण्यात आले आहे. पुतळा पडणार याची कल्पना बांधकाम विभागाला आल्याने त्यांनी पत्र दिले होते. तर या घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. ही आमची मागणी आहे. राज्याच्या विविध प्ररश्नावर तोंड काढून बोलणारेराणे कुटुंबिय या विषयावर गप्प आहेत, आता त्यांची तोंडे कुणी बांधली आहेत का? असा सवाल आ. वैभव नाईक यांनी केला आहे. आम्ही या विषयात सार्वजनिक बांधकाम मंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीचा मोर्चा ..

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी महाविकास आघाडी व जनतेच्यावतीने 28 ऑगस्टला आम्ही मोर्चा काढणार आहोत. या मोर्चात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मालवण भरड नाका येथून हा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चात जनता सहभागी होईल. मात्र, दीपक केसरकर यांनी केलेलं वक्तव्य अशोभनीय आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. अश्या घटनांमध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यास भिक घालणार नाही. या दूर्घटनेला बांधकाम खातेच जबाबदार आहे, त्यामुळे आम्ही ते कार्यालय फोडले असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!