8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्फत साकेडी शाळेत मोफत वह्या वाटप

भाजपा कार्यकर्ते राजू सदडेकर यांनी उपलब्ध करून दिल्या वह्या

कणकवली : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत साकेडी सरस्वती विद्यामंदिर साकेडी शाळा नंबर 1 मधील विद्यार्थ्यांना आज मोफत वह्या वाटप करण्यात आले. सरपंच सुरेश साटम, भाजपा चे सोसायटी संचालक राजू सदडेकर व ग्रामपंचायत सदस्य महम्मद जहूर शेख यांच्या हस्ते या वह्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रा. प. सदस्य दिगंबर वालावलकर, शाळा मुख्याध्यापिका समिधा वारंग, शिक्षक प्रभाकर पावसकर, दीक्षा सावंत आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या वह्यांच्या माध्यमातून शिक्षणासाठी त्याचा योग्य वापर करा व उच्च शिक्षणाचे धडे गिरवा असे आवाहन केले. तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना अशाप्रकारे मोफत वह्या देऊन त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार श्री. साटम यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर पावसकर यांनी केले तर आभार समिधा वारंग यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!