16.2 C
New York
Monday, October 14, 2024

Buy now

सिंधुदुर्गवासीय शिवप्रेमींनी मोर्चात सहभागी व्हावे

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे आवाहन

कणकवली : मालवण किल्ल्यावर गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने घाईगडबडीने निकृष्ट बांधकाम करुन उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी जमीनदोस्त झाला. यामुळे जगभरातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असुन सर्वसामान्य जनतेमध्ये केंद्र आणि राज्य सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे बुधवार दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी मालवण तालुक्यातील भरडनाका ते मालवण तहसिल कार्यालय भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिवप्रेमींनी तसेच सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी मालवण भरडनाका येथे सकाळी 10 वाजता उस्फूर्तपणे उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!