0.5 C
New York
Wednesday, February 11, 2026

Buy now

डोकीवर दांडा मारल्याने पत्नी जखमी 

कणकवली : संशयावरून व घरगुती कारणातून दांडा डोकीवर मारून पती प्रतापराज अशोक सावंत (५०) याने पत्नी प्राची प्रतापराज सावंत हिला जखमी केल्याची फिर्याद प्राची सावंत हिने पोलिसात दाखल केली आहे. आज पहाटे ३.३० वाजता ही घटना घडली.

पती आणि पत्नीमध्ये अगोदर शाब्दीक बाचाबाची झाली. नंतर पती प्रतापराज याने पत्नी प्राची हिच्या डोक्यावर दांडा मारला. यात ती जखमी झाली. तिच्यावर डॉ.तायशेटये यांच्याकडे उपचार करण्यात आले. याप्रकरणी तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद सुफल अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!