सावंतवाडी : मळेवाड येथील चिरेखाणीमध्ये काही दिवसापूर्वी अपघात होऊन एका लहान मुलीचा मृत्यू झाला होता. मात्र याबाबत पोलिसांना कोणतीही कल्पना न देता त्या मुलीचा मृतदेह पुरून टाकण्यात आला होता. खणीमधून दगड घेऊन जाताना ट्रक मागे आल्यामुळे ३ वर्षीय बालिकेवर दगड कोसळून त्यामध्ये तीचा मृत्यू झाला होता.
याबाबत तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून या प्रकरणात आरोपीला अटक केेली होती. या चिमुकल्या मुलीचा अपघाती मृत्यू प्रकरणी आरोपी भिमु धनसिंग लमाणी याची रक्कम रुपये २०,००० च्या जामीनावर सावंतवाडी येथील न्यायदंडाधिकारी यांनी मुक्तता केली.
आरोपीच्या वतीने ॲड. परिमल नाईक यांनी काम पाहिले व त्यांना सहाय्य ॲड. सुशील राजगे, ॲड. रश्मी नाईक, ॲड. अमिषा बांदेकर, ॲड. शंभवी तेंडोलका यांनी केले.