26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

wait for tomorrow आमचं ठरलय …आपला माणूस आपला खासदार

भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे स्टेटस ठरतायत चर्चेचे

निमित्त आहे रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडकीच्या उमेदवाराची

संपादकीय ( मयुर ठाकूर ) : अगदी काही दिवसच लोकसभा निवडणुकांना राहिलेले असताना रत्नागिरी – सिंधुदुर्ग चा महायुयीचा लोकसभेचा उमेदवार अद्याप काही ठरत नाहीय. कधी कधी किरण सामंत यांच नाव जणू काही उमेदवार म्हणून जाहिरच झालं आहे असे वातावरण निर्माण होतेय. दुसरीकडे मंत्री नारायण राणे हे उमेदवार महायूतीतून लढणार असल्याचे जाहीर होणे बाकी आहे. अशातच मागील काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे व्हाट्सॲप स्टेटस चर्चेचे ठरत आहेत.

सोमवारी अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या मोबाईल वर wait for tomorrow आमचं ठरलय …आपला माणूस आपला खासदार अशा आशयाचे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे खरोखरच मंत्री नारायण राणेंच्या नावाची रत्नागिरी- सिंधुदुर्ग च्या उमेदवारीसाठी घोषणा होणार की काय ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!