-0.2 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

रेल्‍वे तिकिटांचा काळाबाजार ; कणकवली बाजारपेठेतून एकजण ताब्‍यात

रेल्‍वे पोलिसांची कारवाई ; बाजारपेठेमधून घेतले ताब्‍यात

कणकवली : रेल्‍वे तिकीटांचा काळाबाजार केल्‍या प्रकरणी एका संशयिताला रेल्‍वे पोलिसांनी सोमवारी कणकवली बाजारपेठेतून ताब्‍यात घेतले. त्‍याच्याकडून तिकिटांचा काळाबाजार केल्‍या प्रकरणी अधिक माहिती घेतली जात आहे. मंगळवारी त्‍याला येथील न्यायालयात सादर केले जाणार असल्‍याची माहिती रेल्‍वे पोलिसांकडून देण्यात आली. रेल्‍वे पोलिसांनी बाजारपेठेतील एका दुकानामध्ये कामाला असलेल्‍या तरूणाला सोमवारी दुपारी ताब्‍यात घेतले. त्‍या तरूणाने आयआरसीटीसी ॲपवरून रेल्‍वेची मर्यादेपेक्षा अधिक तिकीटे काढून ग्राहकांना विक्री केली होती. याबाबत आयआरसीटीसीकडून रेल्‍वे पोलिसांना कळविण्यात आले. त्‍यानंतर रेल्‍वे तिकीटे काढून देणाऱ्या त्या संशयित तरूणाची माहिती घेऊन सोमवारी त्याला ताब्‍यात घेण्यात आले.

रेल्‍वे तिकीट काळाबाजार प्रकरणी एकाला ताब्‍यात घेतल्याचे वृत्त समजल्‍यानंतर शहरातील इतर तिकीट विक्री एजंटांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्‍यान रेल्‍वे तिकीट विक्री आणि बुकींग प्रकरणी रेल्‍वे पोलिसांकडून संशयित तरूणाची चौकशी सुरू आहे. तिकीट बुकिंग साठी वापरला जाणारा मोबाईल, कॉम्प्युटर आदी साहित्‍य देखील पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. या संशयित अधिक चौकशी करून त्‍याला मंगळवारी न्यायालयात सादर केले जाणार असल्‍याची माहिती रेल्‍वे पोलिसांकडून देण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!