10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

आ. वैभव नाईक यांचा कोणत्याही विकासकामाशी संबंध नाही !

भाजप तालुकप्रमुख संजय वेंगुर्लेकर यांचे टीकास्त्र

खोटे श्रेय घेण्यासाठी वैभव नाईक केविलवाणा प्रयत्न

कुडाळ : खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघासाठी ३० कोटीहून अधिक निधी मंजूर झाला आहे. असं असताना स्थानिक निष्क्रिय आमदार वैभव नाईक हे मात्र या कामांचं श्रेय स्वतः घेऊन ग्राम पंचायतींना या विकासकामांच्या मंजुरीची पत्र पाठवत आहेत. वैभव नाईक यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे भाजपने मंजूर केलेली काम अशा पत्रांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याची पोस्टमनगिरी आमदार वैभव नाईक यांनी बंद करावी, असा टोला भाजपचे कुडाळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी लगावला आहे. कुडाळ भाजप कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपचे कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी आज सायंकाळी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन कुडाळ मालवण मतदार संघासाठी भाजपच्या माध्यमातून ३० कोटी ३५ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. त्याचवेळी स्थानिक आमदार वैभव नाईक हे याचे श्रेय घेण्यासाठी ग्राम पंचायतींना पात्र पाठून या कामांचे श्रेय घेत असल्याचे सांगितले आणि आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली. यावेळी विनायक राणे, रुपेश कानडे, पप्या तवटे, सुनील बांदेकर, श्री. पावसकर उपस्थित होते.

संजय वेंगुर्लेकर म्हणाले, खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघासाठी जवळपास 30 कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा निधी उपलब्ध झाल्याबद्दल कुडाळ मालवण मधील जनतेच्यावतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. हे होत असताना या भागातले निष्क्रिय आणि मावळते आमदार वैभव नाईक यांनी या विकासकामाचे पुरण श्रेय घेण्याच्या उद्देशाने गेले काही दिवस ते प्रत्येक ग्रामपंचायतला या विकास कामांच्या मंजुरीची पत्र पाठवत आहेत. हि विकास कामे भाजपच्या माध्यमातून मंजूर झाली. फक्त पोस्टमनगिरी करण्याचे काम आमदार वैभव नाईक करत आहेत. जनतेमध्ये किंवा त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीचा खोडसाळपणा वैभव नाईक करत आहेत.

हे सगळं जर बघितलं तर वैभव नाईक यांच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. वास्तविक जिल्हा अंतर्गत एवढा प्रचंड निधी आपल्या मतदारसंघाला मिळाला. त्यामधील जवळपास १८ कोटी पेक्षा जास्त निधी हा आपल्या कुडाळ तालुक्याला मिळालेला आहे आणि त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. कोणाच्या शिफारशीने हा निधी उपलब्ध झाला त्याची शिफारशी सहित मंजूर यादी आमच्याकडे आहे. हा निधी उपलब्ध होत असताना वेगवेगळ्या हेडच्या खाली हा निधी उपलब्ध झाला. एकूण ३० कोटी ३५ लाख एवढा निधी कुडाळ मालवणसाठी उपलब्ध झाला आहे.

एवढा प्रचंड उपलब्ध झाल्यानंतर या भागातले निष्क्रिय आमदार असलेले आमचे वैभव नाईक बिथरले आहेत आणि अशी खोटी पत्र ग्रामपंचायतला पाठवण्याचा सपाटा त्यांनी लावलेला आहे. वास्तविक पाहता या विकास निधीशी यांचा काडीमात्र संबंध नाही. पत्र पाठवताना त्यांनी म्हटलं की ही विकासकामे तुमच्या ग्रामपंचायत मध्ये मंजूर झाली आहेत. त्याचे कागदपत्रची तुम्ही पूर्तता करा. एक शहाणपणा फक्त त्यांनी दाखवलेला आहे ही विकास कामे माझ्या शिफारशीने मंजूर झाली असे त्यांनी कुठेही म्हटलेले नाही. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या टपाल खात्याचे काम करणारा एक माणूस म्हणून ते काम करत आहेत. त्यांच्याकडे अजून दुसरे कुठले काम शिल्लक राहिलेले नाही. त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासमोर निश्चितपणे दिसत आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेत का, असा प्रश्न आता पडतो.

हा विकास निधी आपल्याला उपलब्ध करून देताना त्यासाठी पाठपुरावा करताना निलेश राणे हे या मतदारसंघातून आणि त्यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष एक विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून ते काम करत आहेत. प्रचंड विकास निधी वेगवेगळ्या विकास कामांसाठी त्यांनी या भागांमध्ये दिलेला आहे. वेगवेगळे प्रकल्प त्यांनी मार्गी लावलेले आहेत आणि हे सगळे करत असताना सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव असे योगदान दिलेले आहे. त्यांच्या या कार्यकर्तृत्ववाने प्रेरित होऊन या भागातली जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे आणि आज लोकप्रिय त्यांची जी लोकप्रियता आहे त्या लोकप्रियतेची धास्ती वैभव नाईक यांनी घेतलेली आहे.

या माध्यमातून गावागावातल्या कार्यकर्त्यांना गावागावातल्या आमच्या सरपंचांना विनंती आहे की तुम्ही वैभव नाईक जे प्रयत्न करत आहेत ते प्रयत्न आपण या ठिकाणी हणून काढले पाहिजेत. आपण त्यांना ठामपणे उत्तर दिले पाहिजे. त्या ठिकाणची त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांना सांगा ही विकास काम आमच्या माध्यमातून झाली आहेत.

हे सांगण्यात एवढाच उद्देश आहे की, मागच्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर लोकसभा निवडणुकीचा जो निकाल लागला आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये कुडाळ मालवण मतदारसंघ मधून जवळपास २७ हजार पेक्षा जास्त मताधिक्य राणेसाहेबांना मिळाले आणि त्या ठिकाणी निष्क्रिय खासदार असलेले विनायक राऊत यांचा पराभव झाला. त्यामुळे ह्या पराभवाची धास्ती वैभव नाईक यांनी घेतलेली आहे. वैभव नाईकांचा पराभव निश्चित आहे आणि तो कमीत कमी ४० हजार पेक्षा जास्त मताधिक्याने आपण करणार आहोत आणि तशा पद्धतीची जी बांधणी आमच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.त्यामुळे वैभव नाईकांचा तोल ढासळत चाललेला आहे. त्यामुळे वैभव नाईक याना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की तुम्ही आता तुमचा गाशा गुंडाळायची सुरुवात करा. दोन महिने तुमचे जे राहिलेले आहेत ते गुण्या गोविंदाने या ठिकाणी काढा, असा टोला संजय वेंगुर्लेकर यांनी आमदार वैभव नाईक याना लगावला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!