सतिष नाईक, संग्राम प्रभुगावकर, पराग नार्वेकर, राजेश गावकर, अमित भोगले यांची प्रमुख उपस्थिती
प्रतिक शिंदे विजेता तर सौरभ भोगले उपविजेता, विजेत्यांना रोख पारितोषिक, चषक व अंतिम १५ स्पर्धकांना मेडल स्वरूपात बक्षिस प्रदान
पोईप | संजय माने-: मालवण तालुक्यातील मसदे येथे शिवसेना शाखा वडाचापाट व अनंत पाटकर मित्रमंडळ तर्फे हॉटेल समर्थ, मसदे तिठा येथे नारळी पौर्णिमे निमित्त नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातील अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दोन स्पर्धकांना प्रथम क्रमांक प्रतिक शिंदे यास रोख रुपये ३५००/- व चषक तसेच द्वितीय क्रमांक सौरभ भोगले यांस रोख रुपये १५००/- व चषक बक्षीस स्वरूपात देण्यात आला. तसेच अंतिम १५ स्पर्धकांना मेडल स्वरूपात बक्षीस देण्यात आले.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित आमदार वैभव नाईक यांचे बंधू व प्रसिद्ध व्यावसायिक सतिष नाईक यांनी स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. मसदेकर गुरुजी यांनी तरुणांना योग्य मार्गाने मार्गक्रमण करण्याबाबत मार्गदर्शन केले. उपशाखाप्रमुख राजकुमार हडकर यांनी शिवसेना पक्ष कायम सामान्य लोकांच्या पाठीशी उभा असल्याचे यावेळी आपल्या भाषणामध्ये बोलून दाखविले.
यावेळी आमदार वैभव नाईक यांचे बंधू व प्रसिद्ध व्यावसायिक सतिष नाईक, कुडाळ मालवण विधानसभा समन्वयक संग्राम प्रभुगावकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, मसुरे विभागप्रमुख राजेश गावकर, पोईप विभागप्रमुख विजय पालव, अमित भोगले, गणेश नेरुरकर, राहुल सावंत, सचिन आचरेकर, वडाचापाट माजी सरपंच प्रमोद पाटकर, मसदेकर गुरुजी, वडाचापाट उप शाखाप्रमुख राजकुमार हडकर, गुरू नेरुरकर, रोहन पालव, भूषण प्रभुलकर, हृषिकेश पाटकर, साईप्रसाद पालव, लक्ष्मीकांत पाटकर, तेजस हडकर, राज हडकर, प्रथमेश हडकर, आयवन फर्नांडिस, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर परब, उपाध्यक्ष पप्पू मुळदेकर, दिलीप पाटकर, बाबल पाटकर, रुपेश पालव, काली मेस्त्री, अजित पालव, दिपक हिर्लेकर, किशोर कासले, अमित (भोळ्या) परब, अभिषेक पाटकर, तन्मय पाटकर, दयू वाडकर, बाळा कदम, किरण कदम, शाहू पाटकर, राजू कासले, जयवंत पांजरी, अनिल मेस्त्री, पप्पू परब यांच्यासाहित शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे अनंत पाटकर यांनी आभार मानले.