7.8 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

आमदार वैभव नाईक यांच्याकडून आडकर, सुर्वे कुटूंबियांचे सांत्वन 

मालवण : आचऱ्याला लगतच्या समुद्रात पात मासेमारी नौकेच्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या सर्जेकोट येथील गंगाराम आडकर व हडी येथील सुर्वे कुटुंबीयांची आज आमदार वैभव नाईक यांनी भेट घेत सांत्वन केले. सर्जेकोटमधील गंगाराम आडकर हे आपली पात नौका घेऊन देवगडच्या दिशेने मासेमारी करण्यास गेले असता दाट धुक्यामुळे रविवारी मध्यरात्री पात नौका दुर्घटनाग्रस्त बनली. यात गंगाराम आडकर, लक्ष्मण सुर्वे, प्रसाद सुर्वे या तिघांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेची माहिती मिळताच आज आमदार वैभव नाईक यांनी सर्जेकोट येथे जात आडकर कुटुंबीयांची तसेच हडी येथे जात सुर्वे कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी उबाठा गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, विनायक कोळंबकर, विनायक आरोलकर, उमेश मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य भारती आडकर, स्नेहा शेलटकर, रेवंडी सरपंच अमोल वस्त, मयूर करंगुटकर, उमेश हडकर, महेश सुर्वे, दीक्षा गावकर, दिनेश सुर्वे आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!