-6.6 C
New York
Tuesday, January 27, 2026

Buy now

बदलापूर येथील अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी द्यावी

ठाकरे शिवसेना मालवण तालुका महिला आघाडीची मागणी..

मालवण : बदलापूर येथे दोन बालिकांवर झालेल्या अत्याचाराबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुका महिला आघाडीतर्फे निषेध व्यक्त करुन या अत्याचार प्रकारणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. या मागणीचे निवेदन मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांना सादर करण्यात आले.

यावेळी ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडी तालुका समन्वयक पूनम चव्हाण, उपजिल्हा संघटक सेजल परब, तालुका संघटिका दीपा शिंदे, शहरप्रमुख रश्मी परुळेकर, युवतीसेना जिल्हा अधिकारी निनाक्षी मेतर, मालवण कुडाळ युवतीसेना प्रमुख शिल्पा खोत, नंदा सारंग, तृप्ती मयेकर, अंजनी्क सामंत, मंदा जोशी, रविना लुडबे, लक्ष्मी पेडणेकर, उपतालुका युवती अधिकारी रूपा कुडाळकर, देवबाग विभागप्रमुख सोनाली डिचोलकर, माधुरी प्रभू, शहर युवती अधिकारी सुर्वी लोणे आदी उपस्थित होत्या.

बदलापूर येथील प्रशालेत शिकणाऱ्या चार वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. हि घटना अतिशय निंदनीय आहे. संपूर्ण देशभर या घटनेचे अतिशय तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आहोत. या घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी, असे ठाकरे शिवसेना तालुका महिला आघाडीतर्फे निवेदनात म्हटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!