सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा सोमवार दि.१९-०८- २०२४ रोजी जय गणेश हायस्कूल , मालवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या १४ वर्षाखालील मुलांच्या गटात कु . फरहान खान तर मुलींच्या गटात कु. स्वरा गावडे , कु. सिमराह बेग , कु. इनाया शेख , १७ वर्षाखालील मुलांच्या गटात कु . जियान मेमन तर मुलींच्या गटात कु . सारा बेग या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट क्रीडा कौशल्य दाखवत विभागस्तरावर धडक मारली.
या सर्व विद्यार्थ्यांची पुढील विभागीय टेबलटेनिस स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. हे सर्व विद्यार्थी विभागस्तरीय टेबलटेनिस स्पर्धेमध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत .या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा यांनी मार्गदर्शन केले . या खेळाडू विद्यार्थ्यांनी शाळेच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे .
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक कार्यकारिणी समिती पदाधिकारी यांनी विजेत्या संघाचे व सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील विभागीय टेबलटेनिस स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .