काँग्रेसतर्फे मागणी ; नवनियुक्त आगारप्रमुख श्री. सूर्यवंशी यांची काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत स्वागत केले..
मालवण : मालवण – मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन मालवण मुंबई रातराणी आणि मालवण – बोरिवली अशा एसटी बस फेऱ्या कायमस्वरूपी सुरु कराव्यात, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी मालवणचे आगारप्रमुख श्री. सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
मालवण आगाराचे नवनियुक्त आगारप्रमुख श्री. सूर्यवंशी यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत स्वागत केले तसेच निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सेवादल काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष महेश अंधारी, संदेश कोयंडे, देवानंद लुडबे, जेम्स फर्नांडिस, गणेश पाडगावकर, ममता तळगावकर, लक्ष्मीकांत परुळेकर आदी उपस्थित होते.
मालवण हे पर्यटन स्थळ आहे, मोठ्या प्रमाणात पर्यटक मालवण मध्ये येत असतात. मालवणहून थेट मुंबईजवळ जाण्यासाठी तसेच मालवणहून बोरीवली येथे जाण्यासाठी एस. टी. बस नाहीत. त्यामुळे खासगी बसने मालवणातील प्रवासी प्रवास करीत आहेत. तसे ज्येष्ठ नागरिक, महिला व इतर प्रवासी यांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी मालवण मुंबई रातराणी व मालवण बोरिवली अशा डोंबिवली दोन्ही गाड्या चालू करण्यात याव्यात. फक्त गणेश चतुथोमाठी १५ दिवसासाठी या गाड्या चालू न करता कायमस्वरुपी चालू करण्यात याव्यात, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. याबाबतचचे निवेदन एसटी विभाग नियंत्रक आणि महाव्यवस्थापक राज्य परीवहन मंडळ मुंबई यांनाही देण्यात आल्याचे श्रीकृष्ण तळवडेकर यांनी सांगितले.