7.4 C
New York
Monday, November 4, 2024

Buy now

अखेर ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना 90 दिवस प्रमाणित दाखला देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश

स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती

सिंधुदूर्ग : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्गत नोंदणी व नूतनीकरणासाठी शासनाच्या आदेशांनुसार ग्रामसेवकांनी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणित दाखले देणे नियमाधीन असताना ग्रामसेवकांनी त्यांस नकार देत संघटनेचा निर्णय सांगून विरोध दर्शविला होता. या संदर्भात प्रसाद गावडे यांनी कामगार संघटनांच्या वतीने शासन निर्णय मोठा की संघटनेचा निर्णय मोठा असा प्रशासनाला जाब विचारून जिल्हाधिकारीं व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते तसा ओत्र व्यवहार देखील करण्यात आला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनता दरबारात त्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पूर्ववत दाखले देण्याचे ग्रामसेवकांना निर्देश देण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरी देखील जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून टाळाटाळ होत असल्याने स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी 29 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद भवना समोर आंदोलना इशारा दिल्यानंतर अखेर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाला जाग आली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामसेवकांना दाखले देण्याचे निर्देश देण्याचे आदेश दिले चे कार्यकारी अधिकारी श्री देशमुख यांनी पत्राद्वारे दिले आहेत. यापुढे गावागावातील गोरगरीब कष्टकरी कामगारांना दाखले देऊन ग्रामसेवकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामसेवक संघटनेला करण्यात येत असून यापुढे दाखले देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात प्रसंगी त्या त्या गावात जाऊन तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!