15.3 C
New York
Saturday, March 22, 2025

Buy now

निवृत्त पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी डॉ. बळवंत राणे यांचे निधन

मसुरे : मालवण तालुक्यातील मूळ पेंडूर येथील डॉ. बळवंत प्रभाकर राणे (62 वर्ष ) यांचे नुकतेच निधन झाले. पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी म्हणून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करून सेवानिवृत्त झाले होते. आपल्या शासकीय सेवेदरम्यान त्यांनी आचरा, कनेडी शिरोडा, कुडाळ आणि मसूरे मध्ये पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी म्हणून काम केले होते. सामाजिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान मोठे होते. अनेक गरजवंतांना त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला होता.

जिल्हा परिषद मध्ये प्रशासकीय कामकाज अतिशय चांगले असल्यामुळे त्यांना वेळोवेळी विविध पुरस्कार मिळाले होते. गोरगरीब जनतेचा आधारवड म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

त्यांच्या पश्चात आई, दोन मुली, एक मुलगा, पत्नी, सून, दोन बहिणी, दोन भाऊ, नातू, भाचे असा मोठा परिवार आहे. युवा सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश उर्फ बाबा राणे यांचे ते वडील होतं.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!