10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर ‘-‘कोकण कन्या’ मुंबईमध्ये डंका करायला सज्ज

खारेपाटण : शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर, वर्षे १९ वे. दरवर्षी मुंबईत सराव करुन कोकणी मुली गावी हंडी फोडायला जात होते . पण यंदा दहीहंडीची पंढरी समजल्या जाणाऱ्या मायनगरीत अर्थात मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाण्यासारख्या मोठ मोठ्या दहीहंडीच्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापुर कोकण कन्या हे कोकणातील एकमेव महिला पथक आहे जे मुंबईतील दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणार आहे.

२४ ऑगस्टला मीरा रोड एक्सपर्ट गोविंदा आणि महाराष्ट्र राज्य दहिहंडी गोविंदा असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय दहिहंडी स्पर्धेत शिवशक्ती महिला गोविंदा पथक कोकण च नाव घेऊन उतरणार आहे. २७ तारखेला दहीहंडीच्या दिवशी मुंबई-ठाणे मधल्या मोठ्या मोठ्या हंड्यांमध्ये सहभागी होणार आहे. कोकणातील महिला पथक हे ६ थर लावून ७ थरांचा विश्वाविक्रम करण्याचा तयारीत आहे. या पथकाच्या या धाडसी उपक्रमाला रत्नागिरी चे नेते श्री.किरण(भैया)सामंत यांनी सर्वोतपरी पाठबळ दिले आहे,पथकाची तयारी आणि त्यांच्या सर्व या प्रवासात भैया आमच्या पाठीशी आहेत, मुंबईतील दहीहंडी उत्सवात कोकणचे नाव नक्की उंचावू असे या महिलांनी सांगितले, सर्व मुंबईतील चाकरमानी मंडळींनी आपल्या या पथकामधे सहभागी होऊन आपल्या भगिनींना साथ द्या असे आव्हान शिवशक्ती महिला महिला पथकाचे कार्यवाह/प्रशिक्षक प्रतिक अशोक गुरव (संपर्क क्रमांक -८८५००१६३५२)यांनी यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!