12.6 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

गोळवण धनगरवाडी रस्ता कामाचा शुभारंभ!

तांडावस्ती विकास निधीसाठी भाजपचे मानले आभार

मसुरे : गोळवण धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. सदरचा रस्ता तांडावस्ती निधीमधून ५ लक्ष विकास निधी मधून होणार आहे. सदर रस्ता कामाचा शुभारंभ माजी सरपंच आभा परब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. गावडे, प्राजक्ता चिरमुले, तसेच संजय पाताडे, नंदू नाईक, भाई चिरमुले, दत्ताराम परब, काशिराम गोळवंकर, सुभाष गोळवणकर, अमित घाडी, बबन वरक, नामदेव वरक, जानू वरक, लक्ष्मण खरात, आप्पा खरात, पांडू वरक व इतर समाज बांधव उपस्थित होते.

सदरचे काम मंजूर करणेसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले. उपस्थित गोळवण ग्रामस्थांनी विकास निधीसाठी आभार मानले आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!