0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

अडीच महिन्यांपूर्वी आई गेली ; नैराश्यात कोल्हापुरात उच्चशिक्षित सख्ख्या बहिण – भावाची राजाराम तलावात उडी घेत आयुष्याचा शेवट

कोल्हापूर : अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी आईच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने उच्चशिक्षित सख्या बहिण भावाने राजाराम तलावात उडी घेत आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही भावडांनी आपल्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली आहे.

दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरातील नाळे कॉलनीत राहणाऱ्या भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी या सख्ख्या भावडांनी राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. हे दोघेही अविवाहित होते. आई पद्मजा निळकंठ कुलकर्णी यांचं अडीच महिन्यांपूर्वी मे महिन्यांत निधन झालं होतं. आईच्या निधनानंतर भूषण आणि भाग्यश्री हे दोघेही बहिण भाऊ नैराश्येत होते. त्यांची सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!