कणकवली : लायन्स क्लब ऑफ कणकवली च्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिन ( world photography Day ) कणकवली कॉलेज येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील कॉलेजच्या युवक व युवती याना फोटोग्राफी कशी करावी व कॅमेरा कसा हाताळावा या व अश्या अनेक विषयावर कणकवली तालुका फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष विनायक पारधिये , पपू निमणकर, योगेश चव्हाण नितीन कुवळेकर , विनोद दळवी यांनी मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी जुन्या कॅमेऱ्याचे प्रदर्शन ठेऊन त्यावेळची फोटोग्राफी आणि आत्ताची डिजिटल फोटोग्राफी यावर सखोल मार्गदर्शन देत त्या मुलांना कॅमेरा हाताळायची संधी दिली.
लायन्स क्लुब ऑफ कणकवली चे अध्यक्ष डॉ. अशोक कदम, सचिव प्रा. दिवाकर मुरकर, महेश काणेकर दादा कोरडे सिद्धार्थ तांबे डॉ . प्रवीण बिरमोळे डॉ. शमिता बिरमोळे कणकवली कॉलेज प्राचार्य युवराज महालिंगे कदम सर, पाटील सर, राठोड सर उपस्थित होते.
यावेळी लायन्स क्लब ऑफ कणकवली च्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त फोटोग्राफर्स यांचा सत्कार करण्यात आला.