10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

मी शब्दाचा पक्का,विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता महायुतीला साथ द्या ; अजित पवार

मंचर : “येथील महिलांची विक्रमी गर्दी प्रथमच पहात आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलणार, आरक्षण जाणार त्यामुळे सवलती जाणार असा खोटा प्रचार केला. तसाच अपप्रचार लाडकी बहिण योजनेबाबतही करत आहेत. विरोधकांना बोलण्यासारखा मुद्दा नाही. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर पुढील पाच वर्ष ही योजना सुरु राहील. कारण मी दिलेल्या शब्दाचा पक्का आहे. हे संपूर्ण राज्याला माहित आहे. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता महायुतीला साथ द्यावी.” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मंचर (ता.आंबेगाव) येथे रविवारी (ता.१८) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजित केलेल्या सन्मान यात्रा व शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे,वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पोपटराव गावडे, देवेंद्र शहा, विष्णू हिंगे, बाळासाहेब बेंडे, पूर्वा वळसे पाटील,विवेक वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटीलअरुण गिरे,प्रकाश पवार उपस्थित होते.

पवार म्हणाले “येथील जनता भाग्यवान आहे. प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले अभ्यासू व कर्तुत्ववान नेतृत्व मिळाले आहे. यापुढेही गतिमान पद्धतीने विकासकामे होण्यासाठी राज्यात प्रथम क्रमांकाच्या मताधिक्याने वळसे पाटील यांना निवडून द्या.”

वळसे पाटील म्हणाले “शेतीपंपाना दिवसा वीज दिली जाईल.मंचर उपजिल्हा रुग्णालयात सिटीसस्कॅन, डायलिसीस मोफत सुविधा आहे. मंचर येथे महिलांसाठी स्वतंत्र रुग्णाल सुरु केले जाईल. शासकीय अभियांत्रिकी महविद्यालयातील अनेक मुले परदेशात उच्च पदावर काम करतात. येत्या पाच वर्षात ६५ कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांचा समावेश कुकडी प्रकल्पात केला जाईल. सातगाव पठार पाणीयोजना, म्हाळसाकांत, बोरघर, फुलवडे, केंदूर-पाबळ परिसरासाठी शेतीला पाणी कामे मार्गी लावली जातील. ”

“पूर्वा वळसे पाटील विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत. विरोधक बदनामी व खोटा प्रचार करतात. वेळप्रसंगी मी त्यांना सडेतोड उत्तर देईल. जनतेची साथ व माता-भगिनींच्या आशीर्वादाने मोठ्या ताकतीने व हिमतीने मी निवडणूक लढविणार आहे. व मोठ्या मताधिक्याने निवडूक जिंकणार आहे.”

-दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री.

“मंत्रिमंडळात जेव्हा दिलीप वळसे पाटील बोलतात तेव्हा सर्वजण सगळे शांत (पिंनड्रॉप सायलेन्स) होतात. त्याचा मुद्दा सर्वजण लक्ष देऊन ऐकतात. कारण त्यांच्या सर्व सूचना नेहमी राज्याच्या व जनतेच्या हिताच्या असतात.”

-अजित पवार, उपमुख्यमंत्री.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!