कणकवली : मतदारांकडे असलेले जुने मतदान कार्ड आता सहजच नव्याने काढता येणार आहे. जुने कार्ड जीर्ण आणि ब्लॅक अॅण्ड व्हाईट असल्याने मतदारांनी नव्याने मतदान कार्ड काढण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मतदार यादीत नाव आहे का ?
भारतीय निवडणूक आयोग वेळोवेळी मतदार यादी अद्ययावत करत असतो. तपशीलांमध्ये काही तफावत आढळल्यास अशा मतदारांची नावे यादीतून काढून टाकली जातात. त्यामुळे मतदार यादीत नाव आहे का, याची पडताळणी केलेली कधीही बरी.
नाव नोंदवायचे असेल तर…
वेबसाईट :
मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आधी www.nvsp.in या वेबसाइटवर जावे लागेल.
मोबाईल अॅप :
राज्य निवडणूक आयोगाच्या टू-व्होटर मोबाइल अॅपद्वारेदेखील मतदार यादीत नाव नोंदविता येते.
जुने ओळखपत्र दाखवायचे असेल तर…
मतदानावेळी जुने ओळखपत्र दाखवायचे असल्यास अन्य एक पुरावा सोबत बाळगावा.
आवश्यकतेनुसार मतदान कार्ड अपडेट करणे प्रत्येकासाठी सोयीचे ठरते. त्यामुळे या सहज, सुलभ आणि सोप्या पद्धतीच्या माध्यमातून मतदारांनी कार्ड अपडेट करावे – उपजिल्हाधिकारी